दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर काल थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.
गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळाली. मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक गणेशभक्त मिरवणुकांमध्ये सामील झाले होते.
मुंबईत रात्री एक वाजेपर्यंत 29 हजार गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच कृत्रिम तलावांत 10 हजार 976 मूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कृत्रिम तलावांसह, चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आले आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.